‘प्रसंगी तिजोरी रिकामी करू, पण शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही’

September 1, 2015 5:32 PM1 commentViews:

cm in latur01 सप्टेंबर : शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रसंगी तिरोजी रिकामी करू, पण शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकर्‍यांना दिलं.

मुख्यमंत्री आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. लातूरजवळच्या आष्टा इथं शेतकर्‍यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि गार्‍हानं ऐकून घेतलं.  त्यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतीची परिस्थिती चिंताजनक आहे, याची जाण आहे. यातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करतेय. पिण्याच्या पाण्यासाठी आजच 86 कोटी रूपये उपलब्ध करून दिले, चार्‍याचीही टंचाई भासू देणार नाही. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी कर्ज काढावे लागले तरी राज्य सरकार मागेपुढे पाहणार नाही.  नंतर त्यांनी येरोली इथं धान्यवाटप मोहिमेची सुरूवात केली.

यावेळी त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि मुख्यसचिव स्वाधिन क्षत्रीय हेही सहभागी झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • निखिल चनशेट्टी

    सत्‍य करुन बोलताहेत मा. मुख्‍यमंत्राी साहेब…………….
    पण अगोदर सत्‍तेतील असणारे नेते हे महाराष्‍ट्राची व देशाची तिजोरी रिकामे करुनच सत्‍तेबाहेर फेकले गेले आहेत. त्‍यात कोणत्‍याही प्रकारची शंका वाटतच नाही. असही आहे.

close