वसईत अनधिकृत वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई

December 29, 2009 9:10 AM0 commentsViews: 3

29 डिसेंबर 'IBN-लोकमत'ने राज्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाळू चोरीचा पर्दाफाश केला होता. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून वसईतल्या तहसीलदारांनी सेक्शन पंपाच्या सहाय्याने वाळू चोरी करणार्‍या 11 जणांवर कारवाई केली आहे. अशा पद्धतीने वाळू चोरी करणारे 200 ते 250 सेक्शन पंप या परिसरात आहेत. तहसीलदारांनी त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. वैतरणाच्या खाडी किनार्‍यालगत भूमीपुत्र अनेक वर्षांपासून बुडी पध्दतीने वाळू उपसा करतात. पण काही धनाढ्य मंडळी प्रशासनाला हाताशी धरून सेक्शन पंपाव्दारे मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा आली आहे.

close