उद्धव ठाकरे 11 सप्टेंबरपासून दुष्काळीभागाच्या दौर्‍यावर

September 1, 2015 10:31 PM0 commentsViews:

Uddhav thackrayaa01 सप्टेंबर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळीभागाचा दौरा करत आहे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. 11 सप्टेंबरपासून ते मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

आज मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व कॅबिनेट आणि राज्य मंत्री यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागात लक्ष केंद्रीत करण्याचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याचे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले आहे. तसंच पाणी पुरवठा, अन्न आणि जनावरांना चारा या जीवनावश्यक गोष्टी प्राधान्याने पुरवण्याचे आदेश आपल्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close