सुनील तटकरे, धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण

September 1, 2015 10:43 PM0 commentsViews:

ncp nashik01 सप्टेंबर : एकीकडे अर्धा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघालाय. दुष्काळ परिस्थितीवर सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. पण याला राष्ट्रवादीचे उन्माद कार्यकर्ते अपवाद ठरले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अलीकडे दुष्काळ दौरा आटोपला. पण, आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नोटांची उधळण केलीये.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये होते. सर्व नेत्यांनी दुष्काळ आणि कुंभ मेळाव्याच्या नियोजनाबाबत सरकारवर टीका केली खरी पण नंतर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी अतिउत्साहामध्ये
आपल्या नेत्यांचं स्वागत करताना चक्क नोटांची उधळण केली. थोडक्यात कायतर नेते दुष्काळावर बोलत आहेत आणि कार्यकर्ते मात्र, खुलेआम दौलतजादा करताहेत. असंच इथं खेदाने नमूद करावं लागतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close