जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध

December 29, 2009 11:12 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध तीव्र होत चालला आहे. मंगळवारी माडबन पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना जमीन मोबदल्याचे चेक वाटण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी काही काळ रोखून धरले. 700 शेतकर्‍यांना जमीन मोबदल्याचे चेक वाटप होणार होत. पण एकाही शेतकर्‍याने हे चेक घेतले नाहीत. सुमारे 1500 शेतकर्‍यांनी माडबन रस्त्यावर मानवी साखळी करून आपला निषेध व्यक्त केला. या प्रकल्पासाठी जमीन संपादीत करण्याची मुदत येत्या 22 जानेवारीपर्यंत आहे.

close