मुंबईकर दुसर्‍या दिवशीही वेठीस, टॅक्सीचालकांचा संप सुरूच

September 2, 2015 12:55 PM0 commentsViews:

mumbai_taxi23452302 सप्टेंबर : मुंबईच्या मुजोर टॅक्सीवाल्यांचा संप आजही सुरूच आहे. त्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. मंगळवारीही त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संप सुरू केला होता, आणि आजही संप सुरूच राहणार आहे.

काँग्रेसचे नेते नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं हा संप पुकारलाय आणि मनसेनंही याला पाठिंबा दिलाय. पण आज टॅक्सी चालकांचा संपाला तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये. मुंबईत रस्त्यांवर अनेक टॅक्सी धावताय. मोबाईल ऍपवरून बुक करता येणार्‍या ओला आणि उबर टॅक्सी सेवेवर बंदी आणा, या मागणीसाठी हा संप आहे. टॅक्सी चालकांनी काल वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता, पण सरकारनं या संपावर अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. थोडक्यात काय, तर आजही मुंबईकरांचे ऑफिसला जाताना आणि येताना हाल होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close