मुख्यमंत्री आज दुष्काळग्रस्त उस्मानाबादमध्ये !

September 2, 2015 1:32 PM0 commentsViews:

cm in osmanabad402 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (बुधवारी) उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौर्‍याचा आजचा दुसरा दिवस आहे.

ते आज भूममधल्या हांडुगरी गावात चारा छावणीची पाहणी करतील, त्यानंतर ते सीना कोळेगाव गावातल्या धरणाची पाहणी करतील. या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

ही पाहणी झाल्यानंतर ते डोमगावात जातील. त्यानंतर ते बीडसाठी रवाना होतील. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी त्यांच्या दौर्‍याची सुरुवात लातूरपासून केली. शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रसंगी तिजोरी रिकामी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिलं होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close