नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सेना-भाजप सदस्यांची तोडफोड

December 29, 2009 2:00 PM0 commentsViews: 7

29 डिसेंबर नागपूर जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेदरम्यान तोडफोड झाली. परिषदेतल्या विविध समितीच्या सदस्यांची मंगळवारी निवड होणार होती. पण या सभेला अध्यक्ष पोचले नाहीत तरीही पुरेशा सदस्य संख्येमुळे कामकाज सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सभा सुरू असतानाच अध्यक्षांनी सचिवांना सांगून सभा तहकूब करायला लावली. त्यामुळे भाजप-सेनेचे सदस्य चिडले. आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरेश भोयर यांनी नुकताच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये भोयर यांच्याबद्दल नाराजी आहे.

close