छोट्या युद्धांसाठी सज्ज राहा, लष्करप्रमुखांचं सुचक वक्तव्य

September 2, 2015 1:06 PM0 commentsViews:

dalbir singh suhag02 सप्टेंबर : भारतानं छोट्या युद्धांसाठी सज्ज राहायला हवं, असं मत लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी व्यक्त केलंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान नवनव्या पद्धती शोधून काढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 1965च्या युद्धाला 50 वर्षं झाल्याबद्दल आयोजित केलेल्या लष्कराच्या तिन्ही दलांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सीमेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचा भंग आणि घुसखोरीचा प्रयत्न होतोय. त्यामुळे सीमाभाग अशांत आहे, त्यामुळेच वेगवान आणि छोट्या युद्धासाठी आपण तयार राहायला हवं, असं दलबीर सिंग यांनी म्हटलंय. अशा प्रकारची छोटी युद्धं कधीही होऊ शकतात, त्याच्या तयारीसाठी जास्त वेळसुद्धा मिळणार नाही, असं मतही त्यांनी मांडलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close