सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू

September 2, 2015 8:38 PM0 commentsViews:

satish sheety402 सप्टेंबर : सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील साक्षीदार अनिल बोर्हाडे यांचा रक्ताची उलटी होऊन मृत्यू झालाय. बोर्हाडे हे पी.एम.पी.मध्ये चालक होते.  सकाळी अकरा वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी त्यांच्या मेहुण्याला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या औंधच्या जिल्हा रुग्णालयात ब्लड प्रेशर, शुगर आणि ई.सी.जी.च्या तपासण्या करण्यात आल्या.

त्या नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. परंतु पुढच्या उपचारांसाठी पिंपरीतील वाय.सी.एम. रुग्णालयात भरती होण्यास सांगितलं. त्यानुसार ते वाय.सी.एम. रुग्णालयात पोहचले. परंतु उपचार सुरू होण्याआधीच रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूच नेमके कारण समजू शकेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close