‘आत्महत्या कशी करावी?’, 89 वेबसाईट्सवर सर्च करून तरुणीची आत्महत्या

September 2, 2015 9:09 PM0 commentsViews:

02 सप्टेंबर : ‘आत्महत्या कशी करावी?’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर ठाण्यातील एका तरुणीने बंगळुरूमध्ये आत्महत्या केली. इशा हांडा असं या तरुणीचं नाव आहे. तीने तब्बल 89 वेबसाईट्सवर आत्महत्या कशी करावी याबद्दल माहिती घेतली होती.isha handa

इशा हांडा ही तरुणी व्यवसायाने फॅशन डिझायनर आणि वेलनेस कन्सल्टंट होती. 26 वर्षीच्या इशाने रविवारी बंगळुरुमधील 13 मजली इमारतीवरुन उडी मारुन तिचं आयुष्य संपवलं. मात्र आत्महत्या करण्याच्या 48 तासांआधी तिने 89 वेबसाईट्सवर ‘आत्महत्या कशी करावी?’ याबद्दल माहिती घेतली होती. हे तिच्या फोनच्या रेकॉर्डवरुन समोर आलं आहे. इशा हांडाने बारावीपर्यंतच शिक्षण ठाण्यात घेतलं होता आणि त्यानंतर अर्थशास्त्राचा अभ्यास पुण्यातून पूर्ण केला होता. आत्महत्येपूर्वी इशाने गूगलवर ‘हाऊ टू कमिट सुसाईड?’ सर्च केलं होतं, असं पोलिसांनी सांगितलंय. मात्र तिने आत्महत्या का केली, याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close