थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनला पहाटे तीनपर्यंत परवानगी

December 29, 2009 2:47 PM0 commentsViews: 1

29 डिसेंबर मुंबई पोलिसांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सेलिब्रेशनलापरवानगी दिली आहे. तसंच कोणत्याही राजकीय पक्षाला कायदा हातात घेवू देणार नसल्याचं सांगितलं आहे. तसंच पब चेक करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असा अप्रत्यक्ष इशाराही पोलिसांनी शिवसेनेला दिला.न्यू इयर सेलिब्रेशनवर शिवसेना नजर ठेवणार असल्याचं शिवसेनेने जाहीर केल्याने पोलिसांनी हा इशारा दिला आहे. थर्टी फर्स्टचं निमित्त साधून जर कुठल्या पब किंवा बारमध्ये अश्लील नृत्यं, ड्रग्ज किंवा यासारखे प्रकार आढळले तर शिवसेना स्टाईलने त्यांच्यावर कारवाई करू असा इशाराही सेनेने दिला होता. तशी पत्रंही पाठवण्यात आल्याचं सेनेने म्हटलं होतं.

close