दाभोलकरांचे मारेकरी अघोरी विद्येने 18 महिन्यात शोधणार -शिवानी दुर्गा

September 2, 2015 11:04 PM0 commentsViews:

02 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी अघोरी विद्येच्या माध्यमातून सापडू शकतात असा दावा करणार्‍या महंत शिवानी दुर्गा आणि अंनिस यांच्यातला वाद आणखी पेटलाय. हमीद दाभोळकरांनी शिवानी दुर्गा यांना आव्हान दिल्यानंतर शिवानी दुर्गा यांनी त्यांचं आव्हान स्वीकारत पुढील 18 महिन्यात दाभोळकरांच्या मारेकर्‍यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील असा दावा केलाय. यासाठी त्यांनी अनुष्ठानाला सुरुवात केलीये.

sadhavi durga

विशेष म्हणजे या अगोदर पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटच्या माध्यमातून दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता. आणि शिवानी दुर्गा यांनी तर अघोरी विद्येच्या माध्यमातून मारेकर्‍यांच्या शोध घेण्यासाठी अनुष्ठानाला सुरुवात केलीय. साध्वी दुर्गा यांच्यावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता मुक्ता दाभोलकर यांनी केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close