डॉ. कलबुर्गी हत्येप्रकरणी संशयित मारेकर्‍यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

September 2, 2015 11:35 PM0 commentsViews:

kalburgi muder case02 सप्टेंबर : डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयित मारेकर्‍यांची रेखाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहे. धारवाड पोलिसांनी 2 रेखाचित्रं प्रसिद्ध केले आहे. कलबुर्गी यांच्या शेजार्‍यांकडे कसून चौकशी करण्यात आली.

तर प्रत्यक्षदशीर्ंकडे  पोलिसांची कसून चौकशी केलीय. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा यापुढचा तपास आता रेखाचित्रांच्या सहाय्यानं होणार आहे. मागील रविवारी डॉ.  कलबुर्गी यांची धारवाड इथं अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्याप्रमाणे हल्लेखोरांनी आणखी एका विचारवंताची हत्या केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close