लँडमाफिया दीपक मानकरचं काँग्रेसमधील निलंबन रद्द होण्याची शक्यता

December 30, 2009 8:38 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर पुण्यातला काँग्रेसचा लँडमाफिया नगरसेवक दीपक मानकर याचं निलंबन काँग्रेस मागे घेण्याची शक्यता आहे. मानकरला पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याबाबत विचार सुरू आहे. पण अजून निर्णय झालेला नाही, असं काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अभय छाजेड यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या यशवंत नातू यांची जमीन बळकावण्याच्या आरोपावरून मानकरवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे मानकरला 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. नातू प्रकरणानंतर मानकरविरुद्ध तक्रार करण्यासाठी अनेकजण पुढं आले होते. त्यातल्या बर्‍याच प्रकरणांची कोर्टात सुनावणी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये मानकरला जामीन मिळाला आहे. दीपक मानकरने कोथरूडमधून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्याचा पराभव झाला होता.

close