दुष्काळाचं सावट आणखी गडद, मान्सून लवकरच परतीच्या वाटेवर !

September 3, 2015 1:01 PM0 commentsViews:

mansoon in keral3403 सप्टेंबर : यंदा दुष्काळाचं सावट आणखी गडद झालंय. निदान सप्टेंबरमध्ये तरी पाऊस दिलासा देईल, ही आशाही फोल ठरण्याची शक्यता आहे. कारण मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

मान्सून राजस्थानमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत मुक्कामी असतो. पण यंदा वेळेआधीच म्हणजे आठवडाभरात मान्सून तिथून परतायला सुरू होण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये रविवारपासूनच हवा कोरडी व्हायला सुरूवात झालीय. त्यामुळे महाराष्ट्रातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होऊ शकतो.

पण, परतीचा मान्सून आणि बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जाता जाता राज्यात पावसाची शक्यता आहे. 10 सप्टेंबरनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close