मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर अवघ्या 8 तासांत शेतकर्‍याची आत्महत्या

September 3, 2015 1:31 PM0 commentsViews:

cm visit osm_faramar suside403 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री दौर्‍यावर आहे. पण, मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. काल बुधवारी मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादचा दौरा आटोपला. त्यांच्या दौर्‍याला आठ तास उलटत नाही तेच शेतकर्‍याने आत्महत्या केलीये.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटसांगवी येथे एका शेतकर्‍याने आत्महत्या केलीये. लक्ष्मण पाटील असं या शेतकर्‍याचं नाव आहे. लक्ष्मण पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातल्या झाडाला गळफास घेऊन जीवन यांत्रा संपवलीये.

एकीकडे मुख्यमंत्री पाहणी करत आणि दुसरीकडे शेतकरी जीवनयात्रा संपवत आहे. दुष्काळाची दाहकता किती भीषण आहे हे यावरून स्पष्ट होत असून मुख्यमंत्री याची काय दखल घेता हे पाहावे लागेल.

मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकर्‍यांचा राडा

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाड्यात सुरू असलेल्या दुष्काळ दौर्‍याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. ते आज परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी भागांना भेट देतायत. परभणीत ढालेगावात शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसमोर शेतकर्‍यांनी गोंधळ घातला. कर्जमाफीवर बोलण्याची मागणी हे शेतकरी करत होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close