शीनाला आईबद्दल होता प्रचंड तिरस्कार, शीनाच्या डायरीत प्रश्नांचा उलगडा

September 3, 2015 2:35 PM0 commentsViews:

sheena bora case03 सप्टेंबर : शीना बोरा हत्येप्रकरणी नवेनवे खुलासे होत आहे. शीना बोराची जुनी डायरी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हाती लागलीये. या डायरीतून आणखी खुलासा झालाय. शीना बोरा – इंद्राणी मुखर्जीच्या नात्यावर नवा प्रकाश या माध्यमातून पडलाय, शीनाने डायरीत इंद्राणीला दुषणं दिलीये. आपले वडील सिद्धार्थ दास आपल्यासोबत नसल्याबाबत शीनानं डायरीतून दु:ख व्यक्त केलं.

शीना आपल्या डायरीत लिहिते..

“बाबा, मी तुमच्यावर खूप रागावली आहे. मी तुम्हाला पत्र लिहू शकत नाही. पण तुम्ही मला पत्र लिहू शकता. मीही तुम्हाला पत्र न
लिहिल्याबद्दल माफी मागते. दहावीत असताना खूप अभ्यास करावा लागतो. माझ्या बारावीच्या परीक्षेआधी तुम्ही मला भेटाल, अशी मला आशा आहे. मी माझ्या आईचा तिरस्कार करते. ती आई नाही तर चेटकीण आहे. सगळ्या बाजूनं मला निराशेनं वेढलं आहे. पण हे सगळं मी कुणाला सांगू ?”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close