अखेर इंद्राणी मुखर्जीनं केला गुन्हा कबूल

September 3, 2015 3:10 PM0 commentsViews:

indrani mukerjea and shina03 सप्टेंबर : शीना बोरा हत्येप्रकरणी अखेर 10 दिवसांनंतर आई इंद्राणीने खुनाची कबुली दिली आहे. शीनाच्या हत्येत सहभागी असल्याची इंद्राणीनं पोलिसांना कबुली दिलीये. तसंच शीनाचा खून कसा केला, त्यावेळेला काय परिस्थिती होती, कोणत्या मार्गावरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते गेले हे सगळं इंद्राणीनं सांगितल्याचं समजतंय. पोलिसांनी इंद्राणीचा जबाब नोंदवला आहे.

दरम्यान, इंद्राणी मुखर्जी प्रकरणात आता चौकशी अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय. पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना या तिघांनाही सध्या खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय. या तिघांची आतापर्यंत स्वतंत्र चौकशी झाली आहे. पण आता या तिघांची कदाचित एकत्र चौकशी होऊ शकते. इंद्राणी, संजीव खन्ना आणि त्याच्या ड्रायव्हरने मिळून शीनाचा 2012 साली खून केला होता. खून करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील गोगोंदच्या जंगलात पुरण्यात आला होता. कॉर्पोरेट क्षेत्राला हादरावून सोडणार्‍या शीना बोरा हत्या प्रकरणी अखेरीस निगरगठ्ठ इंद्राणीने खुनाची कबुली दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close