परभणीत ‘माकप’च्या आंदोलनला हिंसक वळण, पोलिसांच्या 4 गाड्या फोडल्या

September 3, 2015 4:39 PM0 commentsViews:

parbhani_news03 सप्टेंबर : परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी माकपने केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली या दगडफेकीत 3 पोलीस जखमी झाले आहे. संतप्त जमावाने पोलिसांच्या 4 गाड्या फोडल्या. शिंगणापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याआधीच माकपने हा रास्ता रोको केला होता. या प्रकरणी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.

मुख्यमंत्री आज परभणीच्या दुष्काळी दौर्‍यावर होते. यावेळी एकीकडे सुरुवातीपासूनच कर्जमाफी द्या अशी मागणी करत जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर दुसरीकडे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्‍यांची कर्ज माफी करण्यात यावी, या मागणीसाठी आज माकपकडून मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जाणार होते त्या गंगाखेड रस्त्यावरच्या सिंगणापूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. पण हे आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात पोलिसांच्या 4 गाड्या फुटल्या तर 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी 100 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले तर इतर शेतकरी या परिसरातील शेतांनी पळून गेले. नुकतेच मुख्यमंत्री या मार्गावरून पुढे गंगाखेडला गेले असून गगखेद आणि पालम तालुक्यातील 3 ठिकाणी ते भेट देणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close