पाणीकपातीतही नाशिककरांना दिलासा

December 30, 2009 11:08 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर नाशिकमध्ये आता आठवड्यातल्या एकाच दिवशी फक्त एक वेळच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत यापूर्वी आठवड्यातून पूर्ण एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जात होता. मात्र आता शहराच्या चार विभागात वेगवेगळ्या दिवशी दिवसातून फक्त एकच वेळ पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या सगळीकडे पाणीकपात सुरू असताना नाशिककरांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिकच्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे 20 टक्के पाणीकपात करणं गरजेचे असल्याने नाशिक महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

close