‘शेती विकणे आहे’, शेतकर्‍यांवर नामुष्की !

September 3, 2015 6:14 PM1 commentViews:

पंकज क्षीरसागर, परभणी

03 सप्टेंबर : पावसाळा सुरू होवून 3 महिने उलटले या दिवसांत ग्रामीण भागात शेतात विविध कंपन्यांच्या कापूस,सोयाबीन आदी बहरलेल्या पिकामध्ये लावलेले जाहिरातीसाठीचे फलक पाहतो. परंतु परभणी जिल्ह्यात सतत 3 वर्षीच्या दुष्काळामुळे हे बोर्ड गायब झाले असून जिथे तिथे ‘शेती विकणे आहे’ असे फलक लावण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलीय..याबद्दलचा हास्पेशल रिपोर्ट.

parbhani_faramar_se‘शेती विकणे आहे…’या पाट्या लागल्यात परभणी तालुक्यातल्या पिंपळगाव ठोंबरे गावात…सोळाशे लोकसंख्येचं हे गाव पण… दुष्काळामुळे शेतकर्‍यांवर जमीन विकण्याची वेळ आली आहे. 3 महिन्यांत फक्त एक वेळा पाऊस आला. गावातल्या विहिरी, बोअरवेल पूर्णपणे आटल्यात. हाताला काम नाही, आणि खिशात दमडीही नाही. त्यामुळे शेतकरी जमीन विकायला निघालेत.

सावित्राबाई रसाळ…4 महिन्यांपूर्वीच त्यांच्या पतीचं कॅन्सरमुळे निधन झालं. त्या दुखातून सावरत मुलानं शेती करण्याचा प्रयत्न केला. पण बँकांनी कर्ज दिलं नाही, आणि पावसानं दगा दिला. त्यामुळे तो आईला सोडून पुण्याला कामं शोधायला निघून गेलाय.

बाळासाहेब गोरे यांनी  3 महिने शेतातल्या पाण्यावर, सोयाबीन जपलं पण अजूनपर्यंत पाऊस न झाल्यानं, आता पिकं डोळ्यासमोर हातून जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • prakash

    good job pankaj

close