मनसेच टमरेल आंदोलन

December 30, 2009 11:09 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर शाळेतली शौचालयं दुरुस्त करावीत म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी टमरेल आंदोलन केलं. हातात टमरेल घेऊन या विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणाधिकार्‍यांनाच गाठलं. आणि त्यांना जाब विचारला. त्यावर शाळेतली शौचालयं एका आठवड्यात दुरुस्त करण्याचं आश्‍वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिलं. कुर्ला विभागातल्या काजूपाडा इथल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांनी हे अनोख आंदोलन केलं. मोडकळीस आलेली शौचालयं दुरुस्त करण्यासाठी 8 महिन्यांपूर्वीच 23 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पण अधिकार्‍यांच्या वेळकाढूपणामुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.

close