मुख्यमंत्र्यांना करावा लागला शेतकर्‍यांचा रोषाचा सामना

September 3, 2015 7:51 PM0 commentsViews:

03 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (गुरुवारी) परभणीच्या दुष्काळी दौर्‍यावर होते. पण आजच्या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. एवढंच नाहीतर मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबाद दौर्‍यावर परतले नाही तेच एका शेतकर्‍यांना आत्महत्या केलीये. मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्याचा दौरा एकाप्रकारे सपेशल फेलच ठरलाय.cm_parbhani4

जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर दुसरीकडे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्‍यांची कर्ज माफ करण्यात यावी, या मागणीसाठी आज ‘माकप’कडून मुख्यमंत्री ज्या मार्गावरून जाणार होते त्या गंगाखेड रस्त्यावरच्या सिंगणापूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. पण हे आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात पोलिसांच्या 4 गाड्या फुटल्या तर 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी 100 आंदोलकांना ताब्यात घेतलं. या प्रकरणामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. तर दुसरीकडे ढालेगावातही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच संताप व्यक्त केला. कर्जमाफीवर बोलण्याची मागणी या आंदोलक शेतकर्‍यांनी सभास्थानीच बराच वेळ गोंधळ घातला.

दरम्यान, परभणीचा दुष्काळ दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री पाच वाजेच्या सुमाराला नांदेडच्या दौर्‍यावर रवाना झाले आहे. तिथं ते आढावा बैठकही घेणार आहेत. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री रात्री पुन्हा पुणे मुक्कामी येतील आणि उद्या पुन्हा अहमदनगरच्या दुष्काळ दौर्‍यावर रवाना होतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close