बाळगंगा सिंचन घोटाळ्या प्रकरणी आणखी 3 अटकेत

September 3, 2015 9:20 PM0 commentsViews:

balganga03 सप्टेंबर : बाळगंगा सिंचन घोटाळ्यात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरुवारी) आणखी 3 आरोपींना अटक केलीय. आबिद खत्री, जाहिद खत्री, आणि विजय कासट अशी त्यांची नावं आहेत. यापैकी विजय कासट हा तत्कालीन अभियंता तर आणि दोन्ही खत्रीबंधू हे बाळगंगा धरणाचे कंत्राटदार आहेत.

याच घोटाळ्यात यापूर्वीच अटकेत असलेल्या निसार खत्री आणि राजेश रीठे या दोन आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. पण या दोन्ही आरोपींना आजारपणाच्या नावाखाली स्वतःला हॉस्पिटलाईज करून घेतलंय. याप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल झालेत. या सर्वांनी नियम डावलून कंत्राटदारांना या धरणाच्या बांधकामाचं कंत्राट मिळवून दिलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close