स्मिता ठाकरे भेटल्या माणिकराव ठाकरेंना

December 30, 2009 11:11 AM0 commentsViews: 9

30 डिसेंबर स्मिता ठाकरे यांनी मंगळवारी काँग्रसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समजतं. काहीच दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्मिता ठाकरे यांनी राहूल गांधी आणि सोनिया गांधीचं कौतूक केलं होतं. तेव्हाच त्यांचा काँग्रेस प्रवेश होईल असं वाटत होतं. आता त्यांनी मंगळवारी माणिकराव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र स्मिता ठाकरे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याबाबतचा निर्णय झाला नसल्याचं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

close