घातपाताचा डाव उधळला, 1 माओवादी ठार

September 3, 2015 10:08 PM0 commentsViews:

naxal_movement03 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांचे प्रयत्न उधळून लावण्यात पोलिसांना यश आलंय. पोलीस आणि माओवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झालीय.

धानोरा तालुक्यात गट्टा फुलबोडीच्या जंगलात माओवाद्यांचे एक शिबीर असल्याची माहिती मिळाल्याने नक्षलविरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक राजकुमारच्या नेतृत्वात या भागात कोंम्बिग ऑपरेशन सुरू असतांना चकमक झाली एक तासाच्या चकमकीत माओवादी पळुन गेले. घटनास्थळावर एका महिला माओवादीचा मृतदेह तीन बंदुकासह शस्ञसाठा सापडलाय.

सिरोंचा तालुक्यातही सोमनपल्लीच्या जंगलात डीवायएसपी शिवाजी पवार यांच्या नेतृत्त्वाखाली चकमक झालीय. यात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी पोलिसांच्या सतर्कतेने घातपाताचा प्रयत्न उधळला गेलाय. दरम्यान, छत्तीसगडमध्ये माञ दहा दिवसापूर्वी जगदलपूर जिल्ह्यात अपहरण केलेल्या दोन आदिवासी तरुणांची माओवाद्यानी धारदार शस्ञाने गळा चिरुन हत्या केलीय. एकूणच आजच्या चकमकीनंतर छत्तीसगड तेलंगाणाच्या सीमेवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close