तेलंगणात चौथ्यांदा बंद पुकारला

December 30, 2009 11:20 AM0 commentsViews: 3

30 डिसेंबर महिन्याभरात चौथ्यांदा तेलंगणा बंद पुकारण्यात आला आहे. बुधवारी 165 रेल्वे आणि 32 मेट्रो ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय निमलष्करी दलाच्या 30 आणि शेजारच्या राज्यातून विशेष पोलीस दलाच्या 16 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या बंदचा परिणाम अनेक गोष्टींवर जाणवायला लागला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आपली वार्षिक बेठक हैद्राबादहून चेन्नईला घेण्याचं ठरवलं आहे. तर आयटी क्षेत्रावरही त्याचा परिणाम जाणवतोय. कर्मचारी हल्ला होण्याच्या भीतीने ऑफिसमध्ये गैरहजर आहेत.

close