मुख्यमंत्री आज नगरच्या दुष्काळी दौर्‍यावर

September 4, 2015 12:53 PM0 commentsViews:

cm in osmanabad4

04 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवारी) अहमदनगर जिल्ह्याचा दुष्काळी दौरा करतायत. मुख्यमंत्री सध्या पाथर्डीमध्ये आहेत. इथल्या शेतकर्‍यांशी ते संवाद साधतायत. मुख्यमंत्री गेले तीन दिवस मराठवाड्याच्या दुष्काळ दौर्‍यावर होते. गुरुवारी त्यांनी परभणी आणि नांदेड या दोन जिल्ह्यांची पाहणी केली. सर्व पाहणी झाल्यानंतर रात्री नांदेडमध्ये जिल्हा आढावा बैठक झाली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना यावर त्यांनी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या दौर्‍याचा आढावा घेतला, तसंच सरकार करत असलेल्या उपायांची माहिती दिली. मात्र, कोणतीही नवी घोषणा केली नाही.

शरद पवार सातार्‍यात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आज सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करतायत. त्यांच्या दौर्‍याची सुरूवात फलटणमधून होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close