नेत्यांवर टीका हा देशद्रोह ?, गृहविभागाचा अजब फतवा

September 4, 2015 1:05 PM1 commentViews:

vidhan bhavan304 सप्टेंबर : लोकप्रतिनिधींवर टीका करणं आता महागात पडणार आहे. राजकारण्यांवरची टीका म्हणजे देशद्रोह, असं धक्कादायक परिपत्रक म्हणजे जीआर राज्याच्या गृहविभागानं काढलंय. नेत्यांबद्दल द्वेष, तुच्छता, अप्रीती, शत्रुत्व आणि सामाजिक असंतोष पसरवणारी टीका गुन्हा ठरणार आहे. गृहविभागाच्या जीआरमुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा येणार ऐरणीवर येणार आहे.

राजकीय व्यंगचित्रकार आणि कार्यकर्ता असीम त्रिवेदी याच्या व्यंगचित्रांवरून 2011-12मध्ये खार पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्रिवेदी यांनी मुंबईत एक प्रदर्शन भरविले होते. त्यावरून त्यांच्यावर यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्रिवेदी याच्या अटकेवरून अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि देशद्रोह या मुद्यांवर बराच खल झाला. मुंबई हायकोर्टात खटला सुरू झाल्यानंतर, सरकारनं भूमिका बदलली.

त्रिवेदी यांच्यावरचं देशद्रोहाचं कलम काढण्यात आलं. पण या प्रकरणात पोलीस टीकेचे लक्ष्य ठरले आणि राज्य सरकारवरही नामुष्की ओढवली होती. त्यानंतर हायकोर्टाने काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार गृहविभागाने 27 ऑगस्ट 2015 रोजी हे परिपत्रक काढलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • prasenjit

    आच्छे दिन …

close