पुणेकरांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा

September 4, 2015 5:00 PM0 commentsViews:

pune water404 सप्टेंबर : अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत ढकलला गेलाय. मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालीये आता दुष्काळाच्या झळा पुण्यालाही सोसाव्या लागणार आहे. पुणेकरांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. येत्या सोमवारपासून याची अंमलबजवणी सुरू होणार आहे. आज महानगर पालिकेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत ,टेमघर व वरसगाव या धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उरला आहे. कमी पावसामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पाणीचोरी विरोधात भरारी पथके नेमण्याचा आदेश यापूर्वीच पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close