राष्ट्रवादीला दुष्काळी दौर्‍याचा अधिकारच नाही -राज ठाकरे

September 4, 2015 5:17 PM0 commentsViews:

raj on pawar04 सप्टेंबर : दुष्काळी भागाचे दौरे करून काहीही साध्य होणार नाही. मुळात यांचे दौरे हे दुष्काळी टुरिझम आहे असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावलाय. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर दुष्काळी दौरा करण्याचा अधिकारच नाही अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांचा मराठवाड्याचा दौरा आटोपला असून ते नगरच्या दौर्‍यावर आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सातार्‍याच्या दौर्‍यावर आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळी दौर्‍याचा खरपूस समाचार घेत हे दुष्काळी टुरिझम आहे असा टोला लगावलाय. दुष्काळी भागाच्या दौर्‍यांमुळे काहीही साध्य होणार नाही. मुळात दुष्काळग्रस्तांना काय हवं आहे ते त्यांना दिलं पाहिजे. पण यांचे हे दौरे म्हणजे दुष्काळी टुरिझम झालीये. तिथे जाऊन भाषण काय देताय. त्यांच्या भेटी काय घेतायत. आज दुष्काळग्रस्तांना मदतीची गरज आहे. ती लवकरात लवकर पोहचली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तिथे जाऊन भाषण करण्याची आता गरज नाही अशी सडकून टीका राज यांनी केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला.

 राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुष्काळी दौरे करण्याचा अधिकारपण प्राप्त होत नाही. 15 वर्षं तुमची सत्ता होती. तुम्ही 15 वर्षं काही केलं नाही म्हणून आजही परिस्थिती जैसे थेच आहे. जर वेळीच योग्य नियोजन केलं असतं तर आज ही परिस्थिती पाहण्यास मिळाली नसती असा आसूडच राज यांनी पवारांच्या दौर्‍यावर ओढला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close