रुचिका आत्महत्याप्रकरण : निवृत्त डीआयजी राठोडचा जामिनासाठी अर्ज

December 30, 2009 11:23 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर रुचिका गिर्‍होत्रा आत्महत्या प्रकरणातील दोषी निवृत्त डीआयजी एस.पी.एस. राठोड यांनी पंचकुला कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. राठोडच्या विरोधात नव्याने 2 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. रुचिकाचा भाऊ आशु याच्यावतीने एक FIR दाखल करण्यात आली आहे. तर रुचिकाप्रकरणातल्या साक्षी-पुराव्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दुसरी FIR दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत रुचिका प्रकरणी पोलिसांवर दबाव टाकला जात होता. रुचिकाचं शोषण केल्याप्रकरणी राठोडला याआधी 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पण ही शिक्षा अपुरी असंल्याचं रुचिकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी राठोडविरोधात नव्याने दोन FIR दाखल केल्या आहेत.

close