मोदी सरांचा तास

September 4, 2015 4:33 PM0 commentsViews:

04 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवी दिल्लीच्या मानेकशॉ सेंटरमध्ये हा सोळहा पार पडला. आधी छोटंसं भाषण करून मोदींनी देशभरातल्या विद्यार्थांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांबद्दल प्रश्न विचारले. तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता यावर मोदी म्हणाले की, राजकारणी कोणते खेळ खेळतात, ते सर्वांनाच माहिती आहे. एका विद्यार्थ्यांनं विचारलं. तरुणांना शिक्षक बनावसं वाटत नाही. काय कारण असेल? त्यावर मोदींनी त्याच मुलाला विचारलं तुला काय बनायचं.. तो म्हणाले कॉम्प्युटरमध्ये करिअर करायचंय..मोदी लगेच म्हणाले, शिक्षक का नाही व्हायचंय. हीच खरी समस्या आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रत्येकानं आठवड्याला थोडा वेळ द्यावा, असं आवाहन मोदींनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close