झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिबू सोरेन

December 30, 2009 11:24 AM0 commentsViews: 1

30 डिसेंबर झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी बुधवारी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोरेन यांच्यासोबत मंत्री म्हणून भाजपचे झारखंड प्रदेश अध्यक्ष रघुबर दास आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष सुदेश महातो यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. झारखंड मुक्ती मोर्चाच्या या सरकारला भाजपने पाठिंबा दिला आहे. सोरेन त्यांचे सचिव शशिनाथ झा खून प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे शशिनाथ झा यांचे नातेवाईक अतिशय संतापले आहेत. सोरेन यांना पाठींबा देण्याच्या निर्णयामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची टीका त्यांनी केली.

close