स्वयंसेवक असल्याचा अभिमान-पंतप्रधान मोदी

September 4, 2015 9:58 PM0 commentsViews:

pm modi_rss meeting04 सप्टेंबर : नवी दिल्लीत सुरू असलेल्या संघाच्या अखेरच्या बैठकीत आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. संघाचे आणि भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. आपण संघाचे स्वयंसेवक असल्याचा अभिमान आहे. आमच्या सरकारने अनेक सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहे आणि त्याचा परिणाम लवकरच दिसेल असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला.

नवी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून संघ आणि भाजपची बैठक सुरू होती. आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या बैठकीमध्ये भाजप आणि संघ परिवारामधल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक स्थिती कामगारांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. पक्ष आणि संघटनेमध्ये आणखी समन्वय ठेवण्याचंही ठरवण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी 15 मिनिटं भाषण केलं. जनधन योजना सुरू करण्यात आलीये. या योजनेमुळे सरकारला पाच वर्षांसाठी जनादेश मिळाला असून त्याचे परिणाम येणार्‍या काळात दिसतील. आपण काय काम केलंय हे जनतेला पटवून द्यावं लागेल असंही मोदी म्हणाले. तीन दिवस चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत संघाने मोदी सरकारच्या कारभारवर विचारमंथन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे अशी ठाम भूमिका संघाने मांडली.

दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार ची वाटचाल योग्य दिशेनं सुरू असून परिणाम दिसण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा असं मत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close