…नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल -पवार

September 5, 2015 3:31 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_news05 सप्टेंबर : यंदा दुष्काळाचं संकट अतिशय गंभीर आहे. डिसेंबरनंतर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलीय. पाणी कमी आहे, त्यामुळे पाणी जपून वापरायला हवं, असं आवाहन त्यांनी केलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दुष्काळी गावांना भेट दिली आणि शेतकर्‍यांशी संवाद साधला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सरकारला गंभीर इशारा दिला. लातूर, बीड, उस्मानाबाद या फक्त तीन जिल्ह्यांमध्ये सरकार चारा छावण्या उभारणार आहे. यावर शरद पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. गरज असेल तिथे सगळीकडे छावण्या सुरू करा, संकुचित निर्णय घेऊ नका, असं ही पवारांनी ठणकावलं. तसंच त्यांनी राज ठाकरेंना चांगलंच फटकारून काढलं. राज ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आहेत. ते विचारवंत नेते आहेत. पाऊस पडला नाहीतर राष्ट्रवादी जबाबदार, उद्या भूंकप झाला तर राष्ट्रवादीच जबाबदार अशी टीका करायला ते कमी करणार नाही मुळात राज ठाकरे हे जनतेच्या अखंड सेवेत राहणारे नेते असल्याचा टोला पवारांनी लगावला.

दरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यपालांनी हस्तक्षेप करून दुष्काळावर एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. राज्यात भयानक दुष्काळ असल्यानं शेतकर्‍यांचं कर्ज माफ करा, अशी मागणीही काँग्रेसनं केलीय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत काढलेलं परिपत्रक ताबडतोब रद्द करा, अशी मागणीही काँग्रेसनं केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close