रायगडमध्ये सापडलेले अवशेष शीनाचेच, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

September 5, 2015 2:04 PM0 commentsViews:

Sheena Boramurder mystry05 सप्टेंबर : शीना बोरा हत्येप्रकरणी आज आणखी एक नवा आणि महत्त्वाचा खुलासा झालाय. रायगडमध्ये पेणजवळच्या जंगलात सापडलेले अवशेष हे शीनाचे असून त्यातील कवटीचे अवशेष शीनाचेच आहेत हे स्पष्ट झालंय. डिजिटल फेशियल सुपरइंपोझिशनच्या माध्यमातून हे सिद्ध झालंय. तपासातला महत्त्वाचा दुवा यामुळं पोलिसांच्या हाती लागलाय. तर डीएनए तपासणीतून आणखी माहिती उघड होणार आहे.

2012 साली इंद्राणी आणि संजीव खन्नाने शीनाचा खून केला होता. शीनाचा खून केल्यानंतर ़दोघांनी ड्रायव्हरच्या मदतीने रायगड जिल्ह्यातील गोगोंदे परिसरात शीनाचा मृतदेह फेकून दिला होता. तीन वर्षांनतर ड्रायव्हरच्या अटकेमुळे या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. आज इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामला बांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. इंद्राणीसह तीन आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळं या प्रकरणात अधिक चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मुंबई पोलीस कोर्टात मागणी करणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close