राज ठाकरे हे विचारवंत नेते, शरद पवारांनी उडवली खिल्ली

September 5, 2015 5:58 PM0 commentsViews:

05 सप्टेंबर : भूकंप झाला तरी राज ठाकरे राष्ट्रवादीला जबाबदार धरता. मुळात ते अत्यंत दूरदृष्टीचे आणि विचारवंत नेते आहे अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना चांगलंच फटकारून काढलं. ते पुण्यात बोलत होते.sharad pawar on raj

राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकाराच नाही. 15 वर्षं सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही म्हणून आज ही परिस्थिती आहे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. एका प्रकारे राज ठाकरे यांनी शरद पवारांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

पण राज यांनी पहिल्यांदाच शरद पवारांना टार्गेट केलं नाही. या अगोदरही राज यांनी पवारांवर टीका केली. पण, राज यांच्या टीकेला गांभीर्य देण्याची गरज नाही अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती.

परंतु, आज शरद पवारांनी राज ठाकरेंना चांगलंच फैलावर घेतलं. राज ठाकरे हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि विचारवंत नेते आहे. त्यामुळे भूकंप झाला तरी ते राष्ट्रवादी लाच जबाबदार धरता. आणि यंदा पाऊस पडलं नाही त्याला केंद्र सरकार जबाबदार अशी टीका करतात अशा शब्दात शरद पवारांनी राज यांची खिल्ली उडवली.

शरद पवार एवढ्यावर थांबले नाही. ते पुढे म्हणाले, राज हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्‍या घेऊन फिरणारे गृहस्थ आहे. त्यामुळे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा सणसणीत टोला लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close