रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा बंद करण्याची गरज नाही – महापौर

December 30, 2009 1:10 PM0 commentsViews: 1

30 डिसेंबरमुंबईत रोटेशन पध्दतीने पाणी पूरवठा बंद ठेवण्याच्या प्रस्तावाला महापौर श्रद्धा जाधव यांनी विरोध केला आहे. मुंबईत रोटेशन पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनानं ठेवला आहे. अशा पद्धतीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची गरज भासणार नाही असं मत महापौरांनी व्यक्त केलंय. मात्र यापूर्वी महानगरपालिका प्रशासनानं असा प्रस्ताव ठेवला, तेव्हा महापौरांनी पाणी बंद ठेवण्याच्या प्रस्तावाला गरज पडली तर परवानगी द्यावी लागेल असं म्हटलं होतं.

close