केक खाल्याने 14 जणांना विषबाधा

December 30, 2009 1:44 PM0 commentsViews: 1

30 डिसेंबर जेजुरी इथे फेरीवाल्याकडील केक खाल्याने 14 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी तिघांना उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर उर्वरित रुग्णांवर जेजुरीच्याच शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातल्या काही रुग्णांची प्रकृती सुधारत असून, काहीजणांना रात्री उशीरा घरी सोडण्यात येणार आहे. संतप्त जमावाने जेजुरीतल्या आयर्न बेकरीची तोडफोड केली. याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. परंतु पोलिसांनी बेकरी चालवणार्‍या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

close