बीएआरसी वैज्ञानिकाच्या कुटुंबियांची सीबीआय चौकशीची मागणी

December 30, 2009 1:46 PM0 commentsViews: 30

30 डिसेंबर भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बीएआरसीच्या लॅबमध्ये लागलेल्या आगीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वैज्ञानिकांच्या कुटुंबियांनी केली आहे. या आगीमध्ये दोम वैज्ञानिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी उमंग सिंग यांच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. या आगीसंदर्भात चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर लॅबमध्ये कोणतेही ज्वलनशील पदार्थ नव्हते असा दावा भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे करण्यात आलाय. तसंच यासंदर्भातले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

close