शाब्बास ऍडमिन, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी जमवले दीड लाख !

September 5, 2015 9:45 PM0 commentsViews:

05 सप्टेंबर : व्हॉट्सऍप ग्रुपवर कायमच रिकामटेकड्या लोकांचा उद्योग अशी हेटाळणी बर्‍याच वेळा केली जाते. व्हॉट्सऍपवर फक्त निरर्थक आणि बिनबुडाच्या चर्चा रंगतात असंही बोललं जातं. मात्र काही ग्रुप हे सामाजिक भान ठेवणारे ही असतात. असाच लातूरचा छुपा रुस्तुम हा व्हॉट्सऍप ग्रुप आहे.

latur wtsp grpअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यापासून प्रेरणा घेऊन या ग्रुप ने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांसाठी दोन दिवसांत दीड लाख रुपये गोळा केलेत. लातूरच्या काही तरूणांचा ‘छुपा रुस्तम’ नावाचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये 33 तरूण आहेत.

एका मित्राने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची संकल्पना मांडली. बाकीच्या मित्रांनीही त्याला संमती दर्शवली. आणि बघता बघता दोन दिवसांमध्ये दीड लाख रुपये जमा झाले. आता उद्या म्हणजे रविवारी नांदेडमध्ये जो कार्यक्रम होईल तिथे नाना पाटेकर यांच्या हस्ते या दीड लाख रुपयांच्या मदतीचंही वाटप केलं जाणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close