मोदींच्या हस्ते दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचं उद्घाटन

September 6, 2015 1:09 PM0 commentsViews:

COMfdw3UsAAynWo

06 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्ली-फरिदाबाद मेट्रो सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांनी एस्कॉर्ट्स मुजेसर स्टेशनपासून बाटा चौक पर्यत मेट्रोने प्रवास करत मेट्रो अधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी मेट्रोने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी पंतप्रधानांसोबत सेल्फीचा आंनद लुटला.

इंडस्ट्रीयल हब म्हणून ओखळल्या जाणार्‍या हरियानाला राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी मेट्रो मार्गाची सुरवात करण्यात आली आहे. दिल्लीतील बदरपूर पासून फरीदाबादमधील मुजेसर स्टेशनपर्यंत ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. आयटीओ ते बदरपूरपर्यतच जाणारी मेट्रो आता फरीदाबाद ते मुजेसर स्टेशन म्हणजे 14 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान 9 स्टेशन्सआहेत. याप्रकल्पासाठी तब्बल 2500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यासंदर्भात पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close