मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेणार- किरीट सोमय्या

September 6, 2015 3:32 PM0 commentsViews:

Somaiyaa

06 सप्टेंबर : मुंबईत दहीहंडीच्या उत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्यातील एक गाव दत्तक घेणार असल्याची घोषणा खासदार किरीट सोमय्या यांनी केली. तसंच या गावासाठी खासदार फंडातील 10 लाख आणि मदतनिधीतून 15 लाख उभारून एकून 25 लाख रुपये दुष्काळग्रस्त गावांना देणार असल्याचंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गाव दत्तक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

घाटकोपर इथली भाजपचे आमदार राम कदम यांची दहीहंडी किरीट सोमय्यांनी फोडून या उत्सवाला सुरूवात केली आहे. यावेळी किरीट सोमय्यांनी लेझीमवर ठेकाही धरला होता.

दरम्यान, दुष्काळामुळे महाराष्ट्रावर पाण्याचं संकट आहे. महाराष्ट्रातील सर्वच नागरीकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागवत आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी पाण्याचा वापर न साजरी करण्याचा आवाहनही किरीट सोमय्या यांनी मंडळांना केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close