जैन पर्युषण सप्ताहात मीरा-भाईंदरमध्ये मांस विक्रीवर बंदी

September 6, 2015 4:02 PM1 commentViews:

mira bhindar 23406 सप्टेंबर : मिरा भाईंदर पालिका क्षेत्रातील मांसाहारी नागरिकांना या महिन्यात सलग आठ दिवस मांसाहरापासून वंचित राहावं लागणार आहे.

जैन धर्मिय या महिन्यात 11 ते 28 या दरम्यान पर्युषणाचे उपवास केले जातात. त्यामुळे या दरम्यान मांस विक्रीस बंदी घालावी, असा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने मांडला आहे. या प्रस्तावाला शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे.

मात्र सेनेचे 4 नगरसेवक ऐनवेळी अनुपस्थित राहिल्यामुळे प्रस्ताव मंजूर झाला. यापुर्वीही पालिकेच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी पदार्थ ठेवू नये यावर सभागृहातच मोठा राडा झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Nikhil Takalkar

    this is completely unacceptable. Even i am vegetarian but you cant force other people to what to eat or not. Because of they having fast how can they start such rules.

close