पारधी समाजावर हल्ला करणार्‍या गावांवर बहिष्कार घाला- लक्ष्मण गायकवाड

December 31, 2009 9:34 AM0 commentsViews: 24

31 डिसेंबर पारधी समाजावर अत्याचार करणार्‍या गावावर शासकीय बहिष्कार टाकावा अशी मागणी प्रसिद्ध लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी केली आहे. या क्रूर हत्येला सरकारी यंत्रणा, राजकारणी आणि पोलीसच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हल्लेखोर गावावर सरकारी बहिष्कार टाकून, गावाच्या सरकारी विकासयोजना बंद कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम इथे गावकर्‍यांनी निष्पाप पारधी मुलाची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याच्या कुटुंबाला गुरूवारी लक्ष्मण गायकवाड यांनी भेट दिली.

close