भिवंडीत दहीहंडी बांधताना टॉवर कोसळला, गोविंदाचा मृत्यू

September 6, 2015 5:07 PM0 commentsViews:

ganesh patil06 सप्टेंबर : मुंबईत एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचलाय. थरावर थर लावताना गोविंदा जखमी होत आहे. भिवंडीमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय. भिवंडीमध्ये दिघाशी इथं गणेश अनंता पाटील यांचा दहीहंडी बांधत असताना मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश पाटील हे 28 वर्षांचे होते. गणेश पाटील यांनी दहीहंडी बांधण्यासाठी अगोदर एका झाडाला दोरखंड बांधला. त्यानंतर दोरखंड शेजारी असलेल्या टॉवरला बांधण्याचा प्रयत्न केला तेव्हा टॉवर कोसळला आणि त्याखाली येऊन पाटील यांचा मृत्यू झाला.

गणेश पाटील यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. गणेश त्यांच्या मृत्युमुळे या परिसरात शोककळा पसरलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close