पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर माजी सैनिकांचं उपोषण मागे

September 6, 2015 6:30 PM0 commentsViews:

orop_506 सप्टेंबर : वन रँक वन पेन्शन योजनेतील तरतुदीसाठी आंदोलनावर ठाम असणार्‍या माजी सैनिकांनी अखेर उपोषण सोडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर माजी सैनिकांनी आपलं उपोषण सोडलंय. पण, आंदोलन सुरूच राहणार असं माजी लष्कर अधिकारी सतबीर सिंग यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारने 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेची अखेर शनिवारी घोषणा केली. पण, या सैनिकांनी या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आणि आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलं. या योजनेत स्वेच्छानिवृत्ती घेणार्‍या लाभ मिळणार नाही. तसंच एक सदस्यीय समितीच्या ऐवजी पाच सदस्यीय समिती हवी आहे. या मागणी आजही उपोषण सुरू होते. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यातून निवृत्त झालेल्या सर्वांनाच वन रँक वन पेन्शन लागू होईल अशी घोषणा केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर माजी सैनिकांनी उपोषण सोडलंय पण आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलं. येत्या 12 सप्टेंबरला रॅली काढण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close