शिर्डीच साईबाबांचं मंदीर रात्रभर खुलं

December 31, 2009 10:13 AM0 commentsViews: 191

31 डिसेंबर नवीन वर्षानिमीत्त होणारी भाविकांची गर्दी पाहता शिर्डीचं साईबाबा मंदीर गुरुवारी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे साईभक्तांना रात्रभर दर्शनाचा लाभ घेता येईल. त्यातच यावर्षी चंद्रग्रहण असल्याने रात्री 12 ते 1 च्या दरम्यान मंत्रघोषात साईंना अभिषेक घालण्यात येईल. ग्रहण काळात इतर वेळी दर्शन बंद असतं, पण यावेळी मात्र दर्शन सुरू राहणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून साईबाबा संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साईभक्त खूश आहेत.

close